शेअर बाजार घसरला   

मुंबई : पहलगाममधील दहशतवादी हल्ला, भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढल्याचे परिणाम शुक्रवारी शेअर बाजारावर झाले. सेन्सेक्स एक हजाराने तर निफ्टी ३३८ ने घसरला. सेन्सेक्स ७८ हजार ७८० तर निफ्टी २४ हजारच्या पातळीवर बंद झाला. 
 
सेन्सेक्स १ हजार ४ तर निफ्टी ३३८ ने घसरला देशातील सर्वात मोठी खासगी बँक. अ‍ॅक्सिस बँकचे समभाग साडेचार टक्के घसरले. अदानी पोर्ट, बजाज फिनसर्व्ह, स्टेट बँक ऑफ इंडिया, पॉवर ग्रिड, एटर्नल, जाजन फायनान्स, एनटीपीसी, टाटा मोटर्स, महिंद्रा अँड महिंद्रा आणि टाटा स्टीलचे समभाग घसरले. इन्फोसिस आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसचे समभाग वाढले. गेल्या सात दिवसांत निर्देशांक वाढला होता. सुमारे २९ हजार ५१३ कोटींची परदेशी गुंतवणूक झाली होती. 

Related Articles